हर्निया- Hernia

हर्निया

पोटाच्या स्नायूंमधील अशक्तपणा किंवा गॅपमुळे फुगा येतो त्यात आतडे किंवा त्याच्या बाजूची चरबी येणे. कुठल्याही वयात होऊ शकते. पुरुष व स्त्रियांमाध्ये प्रमाण सारखे असते शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज जगभरात यासाठी केला जातो.

कसा होतो

आपले पोट एक बंद पेटीसारखे असते त्याला बंद ठेवणारी भिंत म्हणजे पोटाची बाहेरची आवरण जे कातडी चरबी व स्नायूंचे बनलेले असते. पोटात आतडे व आतड्याच्या बाजूची चरबी व बरेच अवयव असतात ह्या संरक्षण भिंतीत कुठेही थोडा अशक्त पण किंवा गॅप झाल्यास हे सर्व आतील अवयव बाहेर येतात व कातडी खाली फुगा तयार होतो.

उदा. टायरला आलेले गेटर

पोटातील दाब वाढवण्याच्या कोणत्याही वारंवार कारणाने हर्निया होतो.

उदा. लठ्ठपणा, जुना खोकला, जड वस्तू उचलणे, कडक शौचास होणे त्यामुळे शौचस करतांना स्नायुंवर ताण येतो, अनुवंशिक जन्मतः करण माहित नसलेले

लक्षणे

१. जांगेत किंवा पोटावर कुठेही फुगा येणे बारीक वेदना सुरवातील फुगा उभे राहिल्यास खोकल्यास वाढतो व आत ढकल्यास पूर्णतः नाहीसा होतो.

२. छोटा हार्नियाला जर उपचार केला नाही तर वाढत जातो.

३. कधी कधी हा फुगा ढकल्यावरही आत जात नाही अश्या वेळेस वेदना वाढू शकतात

४. काही वेळेस हनिर्याच्या पिशवीतील अडकलेल्या आतड्याला अडसर झाल्याले पोटात खुप वेदना, मळमळ, उलट्या व कडक शौचास होऊ शकते. अशा वेळेस ताबडतोब उपकार ध्यावा लागतो

५. जर अडकलेल्या आतड्याचा रक्त पुरवठा कमी झाला तर Strangulation होते व यात रुग्ण गंभीर होऊ शकतो यात अत्यंत तातडीने शस्त्रक्रिया करवी लागते

निदान

  • डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर
  • सोनोग्राफी केल्यानंतर

प्रकार

  • पोटाच्या वरच्या भागत
  • बैंबीत व बैंबी जवळच्या
  • जांघेच्या खाली
  • आधीच्या ऑपरेशच्या जागी

उपचार

  • ओपन शस्त्रक्रिया
  • दुर्बिणीद्वारे
  • 3D Mesh Repair

FAQs

१. सिगारेट पिण्याचा काही परिणाम होतो का?

यामुळे खोकला येतो. जास्त काळ खोकला राहिल्याने हार्निया होतो. शस्त्रक्रिया झाली असल्यास परत होण्याचा धोका असतो. यातील निकोटीनमुळे पोटाचे स्नायु कम-कुवत होतात व हर्निया होतो.

२. हर्निया सर्जरीचे धोके काय?

जास्त धोके नाही पण कधीकधी रक्तस्त्राव व इन्फेक्शन होऊ शकते. पेशंटला काही दुसरा आजार, मधुमेह, दारू पिणारे वा वयस्कर लोक यांना धोका जास्त परत होण्याची संभावना असते.

३. शस्त्रक्रियेनंतर काय होते?

शस्त्रक्रियेनंतर ३ ते ४ तासात भूल जाते थोड्या प्रमाणात वेदना होतात पण औषधांनी कमी करता येतात ४ ते 6 तास तोंडाने काही घेता येत नाही नंतर सुरवातीला पाणी व नंतर चहा बिस्कीट व हलका आहार घेता येतो. सुरुवातीला लाघवी पास करायला त्रास होऊ शकतो नंतर सुरळीत होते.

४. केव्हा घरी जाता येते?

शक्यतो ४८ तासानंतर गेलेले बरे म्हणजे लघवीचा त्रास, वेदना कमी, जेवण सुरु झाल्यावर गेलेले चांगले. सलाईन मधून औषधोपचार घेता येतो.

५. पूर्ण बरे केव्हा होतो?

साधारण ५ ते ७ दिवसात संपूर्ण बरे होता. तुम्ही पायऱ्या चढू उतरू शकता. अगदी ड्रायविंग करू शकता, पायी फिरू शकतात फक्त ३ ते ६ महिने जड वस्तू, वजन उचलू नये. खोकला आल्यास ऑपरेशनच्या ठिकाणी काऊंटर प्रेशर द्यावे यामुळे टाक्यांवर ताण येणार नाही.

६. डॉक्टरांना ताबडतोब केव्हा दाखवावे?

ताप > 101 F

वेदना औषधोपचाराने कमी होत नसतील अति रक्तस्त्राव सारखी मळमळ व उलटी होणे.