भगंदर - Fistula
भंगेदर - Fistula
शौचाच्या जागेच्या बाजुला छोटे छिद्र असते ते एका छोट्या नळी (track) द्वारे आतड्याला जोडले असते त्यातुन पु येतो. तसंच हे बाह्यमुख असून त्याचे अंतर्मुख हे गुदद्वाराच्या आतील बाजूस तयार होणे म्हणजेच एक नलिका तयार होऊन त्यातून सतत पूरस्ञाव अथवा रक्तस्त्राव होत राहणे. भगंदर होण्याअगोदर त्या ठिकाणी गळू (Abscess)तयार होतो. गळू पक्वावस्थेत गेल्यानंतर तो फूटून त्यातून पूरस्ञाव चालू होतो.
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/04/image002-248x300.jpg)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/04/image002-248x300.jpg)
कारणे
१. शौचाच्या जागेच्या बाजुला पु झाल्याने
२. Crohn’s Disease
३. शौचाच्या जागेचा कँन्सर
४. इन्फेक्शन – क्षयरोग, गुप्तरोग
५. इजा -आधी झालेल्या शस्त्रक्रियेचे इन्फेक्शन
लक्षण
१. सटसट करणारे दुखणे
२. सुज, हात लावल्यावर दुखणे खाज लालसर पणा शौचाच्या जागेच्या बाजूला
३. संडास करतांना वेदना
४. ताप
निदान
- पेशंटला सांगितलेली माहिती व त्यानंतर डॉक्टरांनी केलेली तपासणी
- दुर्बिणीद्वारे तपासणी
- एम.आर.आय. शौचाच्या जागेचा एक्स रे (फिस्टुलोग्राम)
प्रकार
टाईप १: ४५% (Inter-Sphincteric) ट्रॅक शौचाच्या जागेच्या दोन स्नायु मधुन जातो
टाईप २: ३०% (Trans-Sphincteric) ट्रॅक दोन्ही स्नायूंना घेदून जातो
टाईप ३: २०% (Supra-Sphincteric) ट्रॅक दोन्ही स्नायूंच्या वरून पेल्व्हीक स्नायुतुन जातो
टाईप ४: ०५% (Extra-Sphincteric) ट्रॅक शौचाच्या जागेच्या बाजूच्या कातडीतून स्नायूंच्या बाहेरूनच शौचाच्या जागेला जातो
उपचार
१. शस्त्रक्रिया करून पूर्ण ट्रॅक काढून टाकणे
२. क्षारसूत्र: ट्रॅक साप करून विशेष द्रव्य रुपी दोऱ्याने ट्रॅक बांधणे लांबलचक पध्दत, सारखा धागा टोचने, वारंवार होणाऱ्या फिस्टयुलासाठी फायदा नाही
३. दुर्बिणीद्वारे (फिस्टुयुलोस्कोप)
दोन स्टेज a) तपासणी b) उपचार
४. फिस्टयुला प्लग
५. लेझरद्वारे उपचार (Filac) ही अत्यंत चांगली उपचार पद्धती आहे भुलेखाली करावी लागते कमी इजा करून होते वेदनारहित किंवा कमी प्रमाणात वेदना होतात यात लेझरद्वारे ट्रॅक जाळून टाकला जातो व ट्रॅक पूर्ण बंद होतो
६. DLPL (Distal Ligation & Proximal Ligation) ही पध्दत सुद्धा चांगली आहे गुंतागुंतीच्या फिस्टयुला किंवा परत परत होणाऱ्या आजरासाठी
FAQs
१. सर्जरी सुरू असतांना मला काय जाणवेल?
सर्जरीची तयारी सुरू करतांना बारिक सुईने एका ठिकाणी टोचले जाईल. साधारण आर्धा तास शास्त्रक्रियेला लागतो. कधी कधी शौचाच्या जागेपासून खालचे पाय बधीर असतात. पेशंट शुध्दीत असतो व तो डॉक्टरांशी संवाद करू शकतो.
२. लेझर शस्त्रक्रिया कशी केली जाते?
लेझर प्रोब लेझर ट्रॅक मध्ये टाकला जातो व लेझर पनर्जीचा मारा केला जातो व ट्रॅक संपूर्ण जाळला जातो व प्रोब एक एक सेमी ने बाहेर काढला जातो.
३. शस्त्रक्रिये नंतर काय होते?
३ ते ४ तासातच पाणी घेता येते व नंतर उलटी झाली नाही तर लगेच खाता येते. ६ तासा नंतर बेड वरून उठुन आपण चालू फिरू शकतो. नंतर थोड्या प्रमाणात वेदना वाजाणवू शकतात त्या पूर्णपणे इंजेक्शन द्वारे कमी करता येतात.
४. घरी केव्हा जाता येते?
जनरली आपण दुसऱ्या दिवशी आपण ड्रेसिंग करून रुग्णाला घरी पाठवतो बऱ्याच वेळा त्यादिवशी लघवीला त्रास होतो वेदना होऊ शकतात म्हणून अॅडमिट असलयास उपचार करण्यास सोपे जाते म्हणून दुसऱ्या दिवशी गेलेले बरे.
५. काही विशेष आहार घ्यावा लागतो का?
असे काही विशेष आहार नसतो. फायबर युक्त आहार व पाणी भरपूर पिणे योग्य असते.
६. काही विशेष काळजी?
जखम लवकर भरण्यासाठी दिवसातुन 2-3 वेळा सीट्झ बाथ घ्यावा. त्याने स्वच्छता पण राहते.
७. प्रवास केव्हा करता येतो?
एका आठवड्यात प्रवास करता येतो.
८. दैनंदिन केव्हा सुरू करता येते?
४८ तासा नंतर हालचाल सुरू करता येते दैनंदिन ५ ते ७ दिवसात चांगल्या पद्धतीने सुरू करता येते.
९. डॉक्टरांना ताबडतोब केव्हा दाखवायचे?
ताप > 101 f खूप वेदना गोळया घेऊन सुद्धा खूप प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास सारखी मळमळ किंवा उलटी.