डायबेटिक फूट - Diabetic Foot

मधुमेह व पाय

जसजसे मधुमेह रुग्णांचे वय व असल्याचा कालावधी वाढत जातो तसतसे पायांच्या संवेदना कमी होणे व पायाचे रक्ताभिसरण कमी होणे यामुळे पायाचे इन्फेक्शनहोण्याचे प्रमाण वाढते जास्त करून ज्या रुग्णांमध्ये मधुमेह नीट नियंत्रित नसतो.

डायबेटिक फुट मधील विशेष प्रॉब्लेम्स

१) पायाचे रक्ताभिसरण कमी होणे (Ischaemia)

अश्या पायात नाडी कमकुवत वा लागत नाही. पायाची कातडी बारीक होते, केस नाहीसे होतात,पायाला भेगा पडतात, पायाच्या जखमा वेदनादायक असतात. पायाला स्पर्श केल्यानंतर थंडगार लागतो.

२) संवेदना कमी होणे. (न्युरोपॅथी)

पाय गरम व कोरडा असणे. पायाला स्पर्श केल्यानंतर संवेदना कमी वा नसणे. पायाच्या मास्पेशी बाधित होऊन पायाचे स्नायू आकसणे (Clawing) ह्या सर्व गोष्टींमुळे पायाच्या हाडांवर असणारे चरबीचे पॅड (आवरण) हे जागेवरून सरकते. त्यामुळे बोनी एरीयांवर प्रेशर येते. पायाला वाचवण्यासाठी नॅचरल प्रोटेक्टीव मेकॅनिझम म्हणून पायाची कातडी प्रेशरच्या ठिकाणी जाड होते. त्यामुळे कॉर्न (Corn) किंवा कॅलस (Callus) तयार होते. नंतरच्या स्टेजमध्ये कातडीब्रेक होऊन जखम तयार होते.

३) इन्फेक्शन

वरील दोन्ही गोष्टींना इन्फेक्शन कॉम्प्लिकेट करते. ताप, सूज, लालसर पमा येणे, दुखणे पु सुध्दा तयार होते.

४) Combined Lesions

इन्फेक्शन पायाच्या संवेदना कमी असणे व पायाचे रक्ताभिसरण कमी होणे. पायातील सर्वसाधारण प्रॉब्लेम्स ओळखयासाठी व उपचारासाठी मधुमेही रुग्णाला पायात काय बघावे हे माहित हवे.

लवकर प्रोब्लेम लक्षात येणे व त्यावर ताबडतोब उपचार व रुग्णाने काळजी घेतल्यास पाय वाचू शकतो तसेच जीवही.

पायाची घ्यावयाची काळजी

१) पाय स्वच्छ ठेवणे – नियमित धुणे.

२) कोमट पाणी वापरणे – अति गरम पाणी नही, शेकण्याची पिशवी, पॅड, हॉट बॉटल्स, Iodine or Alcohol वापरू नये.

३) पाय कोरडा ठेवणे – दोन बोटांमध्ये पायासाठी मिळणारे लोशन किंवा क्रीम लाऊन कातडी नरम ठेवणे.

४) पायाची बोटांची नख सरळ लाईनीत कापणे. कॉनर्स जास्त आत कापू नये.

५) ब्लेडणे कॉर्न (Corn) किंवा कॅलस (Callus) कट करू नये.

६) अनवाणी चालू नये घरात सुध्दा.

७) जास्त टाईट चप्पल किंवा शु वापरू नये प्रॉपर फिटिंग असलेले पादत्राणे वापरावे.

८) पायाची दररोज तपासणी करावी व काही अडचण असल्यास डायबेटिक फुट स्पेशालीस्ट डॉक्टरांना ताबडतोब दाखवावे.

आपल्या पायाची स्वत: कशी तपासणी करावी.

१) कॉर्न (Corn) किंवा कॅलस (Callus) सरफेस वर बसून पाय जवळ घ्यावा.

२) मोठ्या साईजचा आरसा पायाखाली ६ टे ७ इंच दूर धरावा व बघावे.

  • Crackers भेग.
  • Peeling of Skin पायाचे साल निघणे.
  • Dry Skin त्वचा कोरडी असणे.
  • Color Change रंग बदलणे.
  • जखम असणे.
  • पाय चकाकणे

आपल्या हाताने पाय तपासणे

१) थंडगार पणा/ गरमपणा

२) पायाच्या टाचेच्या कातडी काही ठिकाणी जड झलेली आहे का मुख्यता अंगठ्याला.

३) काही ठिकाणी हाड बाहेर आलेले आहे का.

४) पायाचा आकार

५) पायाची सूज