फिशर - Fissure
फिशर - Fissure
शौचाच्या जागेच्या चमडीला चीरा पडणे. हा आजार स्त्रीया व पुरुषांमध्ये सारख्या प्रमाणात आढळतो अगदी लहान मुले सुध्दा यातुन सुटलेली नाहीत. हा आजार प्रामुख्याने शौचाच्या जागेच्या मागील जागेत (घडाळ्याच्या ६०’ clock जागी) आढळतो.
सहा आठवड्यांच्या आतील असल्यास त्याला Acute आजार म्हणतात व जुन्या आजाराला कडक पडलेल्या भागाला Chronic असे म्हणतात. त्यात कोंब (त्वचा जमा होऊन) सुध्दा असतो.
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/04/Fissure-1-300x300.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/04/Fissure-1-300x300.png)
शौचाच्या जागेला इजा होण्याचे प्रमुख करणे आहे
१. कडक शौचास होणे: बहुतांश बद्धकोष्ठ्ता सोबत. शौचास अधिक जोर लावल्याने शौचाच्या जागेची नाजूक कातडी फाटते.
२. पातळ शौचास होणे: वारंवार जोरात शौचास झाल्याने शौचाच्या जागेची नाजूक कातडी फाटते.
३. बाहेरून इजा झाल्याने: ताप मोजण्यासाठी थर्मामीटर जोरात टाकल्याने. सोनोग्राफी चा प्रोब एन्डोस्कोप किंवा एनिमाची ट्यूब टाकल्याने.
४. बाळाच्या जन्माच्या वेळी.
५. शौचाच्या ठिकाणातुन शारीरिक संबंध केल्याने.
६. दुर्मिळ कारणे: आतड्यांचा crohn’s disease, रक्त कर्करोग, क्षयरोग, viral इन्फेक्शन.
लक्षणे
१. शौचाच्या वेळेस तीव्र वेदना: अति दुखल्याने रुग्ण शौचास जाण्यास टाळतो त्यामुळे आजुन बद्धकोष्ठ्ता वाढते त्यामुळे इजा व कडक शौचास असे चक्र सुरु होते. त्यामुळे शौचानंतर तीव्र वेदना व जळजळ बरेच तास राहते.
२. रक्तस्त्राव: शौचाच्या वेळेस संडासला लागून व टिश्यू पेपरला लागून.
३. शौचाच्या वेळेस जोर लागणे: संडासच्या जागेचा स्नायू आकुंचन पावल्याने.
४. शौचाच्या जागी व आजुबाजुला खाज येणे.
५. कोंब: फिशरच्या कडेला कातडी जमा होऊन कडक बनते.
निदान
Acute फिशर 6 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत औषधोपचाराने बारा होतो.
१. जीवनशैली (Lifestyle) बदल्याने, औषधी Laxative, आहार पद्धतीत बदल, व्यायाम यांचा संयुक्त वापर केल्याने.
२. Sitz बाथ: गरम कोमात पाणी प्लास्टिक च्या टब मध्ये घेऊन त्यात बसल्याने शौचाच्या नंतरचा त्रास कमी होतो.
३. मलम: GTN, Nifedipine ने शौचाच्या जागेचे स्नायू रिलॅक्स होतात.
सर्जरी
१. Botox इंजेक्शन
२. शौच्याची जागा मोठी करणे.
३. Lateral Internal Sphincterotomy आतील स्नायु कट करून त्यांची आकुंचन स्टेज कमी करणे.
४. लेझर सर्जरी: लेझर द्वारे Internal Sphincterotomy करणे.