मुळव्याध - बावासीर - Piles

मुळव्याध - बावासीर- Piles

शौचाच्या जागेला असलेल्या रक्त वाहिन्यांना आलेली सूज.

या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. इंग्रजी नाव Piles किंवा Hemorrhoid. हिंदी नाव बवासीर. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते.

करणे

१. कडक शौचास होणे.

२. शौचास जोर लावणे.

३. शौचास जास्त वेळ बसणे.

४. अनुवंशिक

५. जड वस्तू उचलणे

६. वजन जास्त असणे

लक्षणे

१. वेदनारहित रक्तस्त्राव

२. शौचाच्या जागेच्या बाजूला गाठी येणे

३. खाज येणे

४. अंडर गारमेंटसंला डाग पडणे

५. रक्ताची गुठळी तयार झाली तर वेदनायुक्त गाठ होते.

निदान

  • पेशंटने दिलेली माहिती व डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर

  • प्रोक्टोस्कोपी दुर्बिणीची तपासणी

स्टेजेस

स्टेजेस १: वेदनारहित रक्तस्त्राव, खाज

स्टेजेस २: शौचाच्या आतील गाठ शैचाच्या वेळेस जोर लावल्यानंतर बाहेर येते व लगेच आत मध्ये जाते.

स्टेजेस ३: गाठ संडासनंतर आपोआप जात नाही नीला बोटाने आत ढकलावी लागते.

स्टेजेस ४: खुप रक्तस्त्राव, गाठ कायमस्वरूपी बाहेर राहते.

उपचार

१. जीवनशैली (Lifestyle) बदल्याने, औषधी Laxative, आहार पद्धतीत बदल, व्यायाम यांचा संयुक्त वापर केल्याने.

२. लेझरव्दारे उपचार (Laser Haemorrhoidoplasty): स्टेज २ व ३ ची साठी उत्तम ईलाज आहे. लेझर एनर्जीच्या मारा करून गाठ संकुचित पावते.

फायदे: चिरफाड नाही, जखम नाही, वेदनारहित व कमी वेदना, टाके नाही, ईजा कमी दुष्परिणाम पेशंट दैनंदिन जीवन लगेच सुरु करू शकतो.

३. स्टॅपलर सर्जरी: स्टेज ३ व ४ साठी उत्तम ईलाज circular स्टॅपलर वापरून शौचाच्या जागेवर आतील म्युकोजा पूर्ण गोल स्वरूपात कापून टाकण्यात येतो.

फायदे: बाहेरून काहीच चिरफाड नाही, टाके नाही, कमीत कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी धोका, लवकर दैनेदिन जीवन सुरु करता येते ५ दिवसात, डायबेटीस, वयस्कर व रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सुरक्षित.

धोके: इन्फेक्शन, रक्तस्त्राव, संडासची जागा छोटी होणे.

FAQs

१. सर्जरी सुरू असतांना मला काय जाणवेल?

सर्जरीची तयारी सुरू करतांना बारिक सुईने एका ठिकाणी टोचले जाईल. साधारण आर्धा तास शास्त्रक्रियेला लागतो. कधी कधी शौचाच्या जागेपासून खालचे पाय बधीर असतात. पेशंट शुध्दीत असतो व तो डॉक्टरांशी संवाद करू शकतो

२. शस्त्रक्रिये नंतर काय होते?

३ ते ४ तासातच पाणी घेता येते व नंतर उलटी झाली नाही तर लगेच खाता येते. ६ तासा नंतर बेड वरून उठुन आपण चालू फिरू शकतो. नंतर थोड्या प्रमाणात वेदना वाजाणवू शकतात त्या पूर्णपणे इंजेक्शन द्वारे कमी करता येतात.

३. घरी केव्हा जाता येते?

जनरली आपण दुसऱ्या दिवशी आपण ड्रेसिंग करून रुग्णाला घरी पाठवतो बऱ्याच वेळा त्यादिवशी लघवीला त्रास होतो वेदना होऊ शकतात म्हणून अ‍ॅडमिट असलयास उपचार करण्यास सोपे जाते म्हणून दुसऱ्या दिवशी गेलेले बरे

४. काही विशेष आहार घ्यावा लागतो का?

असे काही विशेष आहार नसतो. फायबर युक्त आहार व पाणी भरपूर पिणे योग्य असते

५. काही विशेष काळजी?

जखम लवकर भरण्यासाठी दिवसातुन 2-3 वेळा सीट्झ बाथ घ्यावा. त्याने स्वच्छता पण राहते

६. शौचाला ताबा जाईल का?

नाही शौच्याची पक्रिया पहिल्या सारखीच राहील. सुरवातीला काही दिवस थोडा त्रास होतो व शौचास थोडी घाई होते. थोडा रक्तस्त्राव होऊ शक्तो. हे सर्व हळूहळू परत सुरळीत होत काही दिवसात. स्वच्छतापाळावी

७. दैनंदिन केव्हा सुरू करता येते?

४८ तासा नंतर हालचाल सुरू करता येते दैनंदिन ५ ते ७ दिवसात चांगल्या पद्धतीने सुरू करता येते

८. ताबडतोब केव्हा दाखवावे?

ताप > 100 F अति वेदना, सूज, लालसर पणा येणे, अति रक्तस्त्राव, शौचास न होणे ३ दिवसांपेक्षा जास्त काळात.