माकडहाडाच्या वरील त्वचेत छोटे छिद्र एकमेकांना नळी सारख्या ट्रॅक ने जोडलेले असतात. त्यातून दुर्गंधीत स्याव येतो केस पण येतात.
१. पुरुषांमध्ये जास्त प्रमाण
२. आरामदायी जीवनशैली
३. जास्त काळ बैठे काम (गाडी चालक)
४. अति जाड, कुरळे केस माकडहाडावरील भागात
५. जाड व्यक्ती
६. अनुवंशिक
७. त्वचेचा खोल भाग असल्यास
१. वारंवार सूज व वेदना माकडहाडाच्या भागात
२. दुर्गंधीत स्याव पु माकडहाडच्या भागातून
३. वेदनायुक्त सूज
४. ताप
१. Wide Excision: यात संपूर्ण ट्रॅक काढुन टाकला जातो व खोल जखम (Cavity) तयार होते ती साईडन व खालून वर अश्या पद्धतीने भरते-ड्रेसिंग वारंवार करावे लागते. ३ महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो पद्धत सुरक्षित आहे. १० ते १५ % परत येण्याची शक्यता असते.
२. LPP (Laser Pilonidoplasty): कमी चिरफाड छोटे छिद्र मोठे करून पु काढून ट्रॅक चांगला साफ केला जातो नंतर लेझर फायबरने संपूर्ण ट्रॅक जाळला जातो व सिल केला जातो.
फायदे: २४ तासात दवाखान्यातून सुटी करता येते, दैनंदिन प्रक्रिया ४-५ दिवसात सुरु करता येते, ६ ते ८ आठवड्यात संपूर्ण जखम भरते, परत येण्याची शक्यता कमी असते.
३. Excision Primary Closure: संपूर्ण ट्रॅक कापून लगेच टाके घेतले जातात इन्फेक्शनचे प्रमाण २० ते २५ % असते परत करण्याची गरज पडू शकते.
४. FLAP SURGERY: संपूर्ण ट्रॅक कापून टाकल्यानंतर तयार झालेली मोठी जखम बंद करण्यासाठी व टाके मध्य भागाच्या बाजुला जाण्यासाठी 2 Plasty, Limberg Flap/ Gluteal Flap करता येते.
परत येण्याची संभावना जास्त, इन्फेक्शन, वेदाना प्रमाण जास्त फ्लॅप चे कातडी पडण्याची शक्यता.
१. सर्जरी सुरू असतांना मला काय जाणवेल?
सर्जरीची तयारी सुरू करतांना बारिक सुईने एका ठिकाणी टोचले जाईल. साधारण आर्धा तास शास्त्रक्रियेला लागतो. कधी कधी शौचाच्या जागेपासून खालचे पाय बधीर असतात. पेशंट शुध्दीत असतो व तो डॉक्टरांशी संवाद करू शकतो
२. शस्त्रक्रिये नंतर काय होते?
३ ते ४ तासातच पाणी घेता येते व नंतर उलटी झाली नाही तर लगेच खाता येते. ६ तासा नंतर बेड वरून उठुन आपण चालू फिरू शकतो. नंतर थोड्या प्रमाणात वेदना वाजाणवू शकतात त्या पूर्णपणे इंजेक्शन द्वारे कमी करता येतात.
३. दैनंदिन केव्हा सुरु करता येते?
त्याच दिवशी तुम्हाला चालता फिरता येते. संडासला काहीच त्रास होत नाही. लेझर सर्जरी नंतर ३-४ दिवसात ऑफिस ला जाऊ शकतो. इतर शस्त्रक्रिये नंतर २ ते ४ आठवडे आराम लागू शकतो.
४. जखमेची काय काळजी घ्यवी लागते?
जखम स्वच्छ ठेवली पाहिजे. आंघोळ करता येते स्वच्छ पाण्याने, साबण वापरू नये. जखम माऊ कपड्याने कोरडी करावी. टाल्कम पावडर वापरू नये. सैल अंदरविअर कॉटनची वापरावी. फायबर युक्त आहार घ्यावा जेणे करून शौचास जोर लावावा लागणार नाही.
५. डॉक्टरांना ताबडतोब केव्हा दाखवावे?
अति वेदना, वरदाना नाशक गोळ्या घेऊन ही कमी न झाल्यास जखमच्या बाजूला लाल होणे व सूज होणे ताप > 101 F, रक्त, पू जास्त प्रमाणात जाणे, दुर्गंधीत स्याव जाणे.